विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून मानकीत साकारला वनराई बंधारा , सेवा संकल्प अभियानातून जलसंवर्धनाचा संदेश; कृतीतून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक व सामाजिक जाणिवांचे धडे

वणी : 

सेवा संकल्प अभियानांतर्गत मानकी येथे जि.प. उच्च प्राथमिक शाळा व ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून वनराई बंधारा बांधण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदानात सहभागी होत जलसंवर्धनाच्या उपक्रमाचा आनंद अनुभवला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ श्रमदानाची अनुभूतीच नव्हे, तर पाणी अडविणे, पाण्याचे संवर्धन आणि पर्यावरणाचे महत्त्व यासंदर्भातील वैज्ञानिक व सामाजिक जाणिवांचे धडे मिळाले.
ग्रामपंचायत कर्मचारी

या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक आनंद पाटील, शिक्षक सुनील वाटेकर, श्रीकांत पिंपळशेंडे, श्रीमती अनिता नालमवार, कु. सपना ढवस, कु. दर्शना पिपराडे, ग्रामसेवक ऋषीकेश सोळंकी  ग्रामपंचायत कर्मचारी अविनाश सरवर, अमर खुसपुरे, प्रदिप मालेकर यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांनी बंधारा बांधण्याच्या कामात उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्यक्ष कृतीतून पावसाचे पाणी अडविण्याचे तंत्र, जलसाठ्याचे महत्त्व आणि जलस्रोतांचे संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांना अनुभवात्मक ज्ञान मिळाले. ‘शिकणे आणि करून पाहणे’ या संकल्पनेला या उपक्रमातून प्रत्यक्ष रूप मिळाले.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक कार्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मानकी येथील हा उपक्रम जलसंवर्धनासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीचा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post