वणी :
१९ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सर्पदंश जनजागृती दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाच्या निवासी संस्थांमध्ये १९ ते २६ सप्टेंबरदरम्यान सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा एक भाग म्हणून वणी येथील जनता शाळेजवळील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात सर्पदंशाबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी वसतिगृहाच्या गृहपाल मीनाक्षी चव्हाण, जीवनसृष्टी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिष कापसे तसेच पगमार्क वाईल्ड लाइफ फाउंडेशनचे अध्यक्ष व सर्पमित्र दिनेश तिवाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्पमित्र हरिष कापसे व दिनेश तिवाडे यांनी विद्यार्थिनींना सर्पदंश टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, साप आढळल्यास घ्यावयाची खबरदारी तसेच सर्पदंश झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध शंकांचेही यावेळी निरसन करण्यात आले.
या कार्यक्रमाला गजानन क्षीरसागर, सूरज नथ्थूजी पारशिवे, तोहीद शेख, अर्जुन राठोड, सुदर्शन क्षीरसागर, सोनू पेंदोर, पूजा आत्राम, रोहित इनाके, अनिकेत काकडे, आर्यन कवाडे, ऋषीकेश कठाणे, आतिश शेंडे, योगेश केळझरकर यांच्यासह सर्पमित्र उपस्थित होते.