भाजपाचे 'चानाक्य' प्रभाग ११ चा गढ़ राखेल काय? चर्चेला उधान ; निकालाच्या प्रतीक्षेत जनता

वणी /

वणी नगर परिषदेची निवडणूक झाली मात्र निकाल लांबणीवर पडल्याने आता प्रभाग निहाय गणीतांचे बेरीज सुरू झाले. कोणत्या प्रभागात कोणाची काय रणनीती होती हे आपण ह्या लेखातून जाणून घेऊया. 

भाजपाचे चानाक्य अशी ज्यांची ओळख आहे असे मनोज सरमोकदम यांची नगर परिषद निवडणूकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण ते भाजपाचे उपाध्यक्ष तथा प्रभाग प्रभारी असून त्यांचेकडे पक्षाने प्रभाग ११ ची जबाबदारी सोपवली होती. अगदी सुरुवातीपासूनच प्रभागामध्ये तिकीट वाटपामुळे नाराजी नाट्य पाहायला मिळाले. साऱ्या वणी शहराचे लक्ष लागून असलेल्या प्रभाग ११ हा भाजपाचा गढ़ मानला जातो. परंतु प्रभागामधून एकून १६ अर्ज पक्षाकडे प्राप्त झाले त्यातून एकाची निवड करणे म्हणजे १५ कार्यकर्त्यांना सांभाळणे हे भाजपासाठी अवघड काम होते. ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी लवलेश लाल यांना उमेदवारी देवून प्रभागाचा रंगच बदलून टाकला. मनोज सरमोकदम यांचे संघटन कौशल्य व बुथ लेवल वरचे काम बाकीचे पक्ष, अपक्ष, आपआपल्या रॅली मध्ये मग्न असताना मनोज सरमोकदम मात्र बुथ लेवल वर आपल्या घरी कार्यकत्यांना घेवून नियोजन आखताना दिसत होते. त्यांनी आपल्या प्रचाराची मोहीम वणी शहराध्यक्ष ऍड निलेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे यांना सोबत घेवून अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सुरु ठेवली. गेल्या ३८ वर्षापासून सक्रीय कार्यकर्ता म्हणून मनोज ची वणीत ओळख आहे. आज त्यांच्याकडे पदवीधर मतदार संघ अध्यक्ष यासारख्या अनेक जबाबदाऱ्या पक्षाने त्यांच्याकडे सोपवील्या आहे. पक्ष संघटन मजबूत करणे व भारत मातेला परम वैभवाकडे नेण्यासाठी डोळ्यासमोर उद्दीष्ट ठेवून जमीनी पातळीवर त्यांचे कार्य व सेवा अविरत चालू आहे. आता हे चानाक्य प्रभाग ११ चा गढ कायम ठेवतात काय? हे येत्या २१ तारखेला स्पष्ट होईलच! परंतु त्यांनी आपली नियोजन बद्ध निति राबवून निवडणुकीच्या रींगनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे १६ पैकी १५ कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी सुद्धा भाजपच्या पथ्यावर पडू शकते आणि हे सर्व निकालाच्या वेळी पहायला मिळू शकते ऐवढे मात्र खरे...!

Post a Comment

Previous Post Next Post