संजय देरकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या एका गटाची तीव्र नाराजी ! कॉंग्रेसचे संजय खाडे करणार सांगलीचा "विशाल पाटील पॅटर्न "

वणी :

जनतेच्या मनातील नेता संजय खाडे यांनी अपक्ष लढावे, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरली आहे, त्यामुळे काँग्रेसचे संजय खाडे सांगलीचा "विशाल पाटील पॅटर्न" करणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कांग्रेस पक्षातुन दुसरी अशी माहिती येत आहे की काँग्रेस पण स्वंतत्र उमेदवार उभा ठेऊन मैत्रीपूर्व लढत घडवून आणू शकते. अशी चर्चा आता कॉंग्रेसच्या एका गटातुन सुरू झाली आहे. 
असे झाल्यास काँग्रेस कडून संजय खाडे, उबाठा कडून संजय देरकर, भाजपकडून संजीव रेड्डी बोदकुरवार , मनसेचे राजू उंबरकर यांच्या मध्ये चौरंगी लढत होऊ शकते.
 आता काँग्रेस पक्ष संजय खाडे यांच्या बाबत काय भूमिका घेईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
संजय खाडे सारखा तुल्यबळ उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात राहिल्यास महाविकास आघाडी चे उमेदवार संजय देरकर यांच्या विजयाची गणित बिगडू शकतात हे विशेष! आता संजय खाडे महाविकास आघाडीचा भाग समजून उबाठाचे संजय देरकर यांना पाठिंबा देणार की अपक्ष लढणार ? हा जनतेला पडलेला प्रश्न आहे.

Post a Comment

Previous Post Next Post