मनसेचे उमेदवार राजु उंबरकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

वणी -

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार २२ ऑक्टोंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
 वणी, मारेगाव, झरी विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजु मधुकरराव उंबरकर हे उद्या २५ ऑक्टोंबर रोजी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. वणी उपविभागीय कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी ते मोठ शक्ती प्रदर्शन करणार आहे.  
 राजु उंबरकर नामांकन दाखल करताना विधानसभा क्षेत्रातील वणी , मारेगाव व झरी जामणी तालुक्यातील हजारो मनसे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे प्रवक्ता यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post