वणी /
शहरात चोरीच्या घटनेत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील एका सराफा व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून १२ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आलीय तर दुचाकी घरफोडीच्या घटना ह्या नित्याचाच झाल्या आहेत.
शनिवारी मध्यरात्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रसिद्ध अमोल टि आणि पान कॉर्नर काही अज्ञात व्यक्तीने फोडून पंधरा ते वीस हजार रुपयेचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती वणी पोलिसांना देण्यात आली असून अजुनपर्यंत तक्रार दाखल करण्यात आली नाही अशी माहिती अमोल रमेश मडावी यांनी स्टिंग ऑपरेशन न्यूज ला दिली.