जिल्हा नियोजन समितीवर विजय पिदुरकर यांची नियुक्ती , यवतमाळ जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून शासनाकडून संधी

स्टिंग ऑपरेशन न्यूज / वणी :

महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून यवतमाळ जिल्हा नियोजन समितीवर विजय पिदुरकर यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे त्यांना जिल्ह्याच्या विकास नियोजन प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
विजय पिदुरकर यांच्या सामाजिक कार्याची, जनसंपर्काची तसेच विकासाभिमुख दृष्टिकोनाची शासनाने दखल घेतल्याचे या नियुक्तीतून स्पष्ट होत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकासकामांचे नियोजन आणि अंमलबजावणी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात.
या पार्श्वभूमीवर पिदुरकर यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील विकासविषयक प्रश्न, स्थानिक गरजा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा समितीसमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासकामांना हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विजय पिदुरकर यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post