वणी /
शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर संतोष भोयर यांच्या पत्नी डॉक्टर सौ प्रियंका भोयर (खुटेमाटे) अंदाजे वय (३१) यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली.
शहराच्या मध्यभागी गांधी चौकात असलेल्या वात्सल्य बाल रुग्णालय असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर त्या आपले पती डॉक्टर संतोष भोयर व एक सहा ते सात वर्षांच्या मुलीसह वास्तव्यास होत्या. डॉ प्रियंका ह्या गुरुवारी रात्री झोपी गेल्या मात्र सकाळी उठल्याच नाही त्यामुळे त्यांचे पती संतोष भोयर यांनी चौकशी केली असता पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजले. या घटनेची माहिती त्यांनी नातलगांना तसेच मित्र परिवार यांना दिली असता डॉ प्रियंका भोयर यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. कमी वयात अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या मृत्यूचे खरे कारण ओळखण्यासाठी त्यांच्या मृत्यूदेहाचे शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
(स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!💐)