ओव्हरलोड वाहतूकीवर निर्बंध घालण्याची मागणी

वणी:-

 वणी परिसरात कोखसा डोलोमाईट अशा अनेक खाणी आहेत परिणामी सदर खाणीमधून दररोज ट्रक द्वारे जिवघेणणी ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने सूरू असलेली ओव्हरलोड वाहतूकीवर निर्बंध घालावेत अशी मागणी उपविभागीय अधिकारी वणी यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख शिवराज पेचे यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वणी शहराच्या सभोवताल कोळसा व डोलामाइनच्या मोठ्या प्रमाणात खाणी आहेत. या खाणीतून दररोज अवैध रित्या ट्रक मधून ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. या जड वाहतुकीमुळे रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.रस्त्याच्या वाहन क्षमते पेक्षा अधिक ज्यास प्रमाणात वाहतूक केली जात आहे. प्रामुख्याने वांजरी गावातील खाणीतून होणाऱ्या सिमेंट दगडाची अतिशय धोकादायक पध्दतीने वाहतूक होत असल्यामुळे त्या मार्गावरील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते. तसेच या मार्गावर नामांकित शाळा आहे. त्या शाळेमध्ये आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना व वणी शहरातील विद्यार्थ्यांना या शाळेत शिक्षण घेण्यासाठी ये- जा करावे लागते. तसेच या मार्गावर सहारा पार्क, तुळजाभवानी नगर, महालक्ष्मी नगर, भांडेकर लेआऊट,नवकार नगर अशा कॉलनीतील नागरिक व विद्यार्थ्यी या मार्गावरून ये जा करीत असतात त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आहे.यामार्गावर नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात बऱ्याचदा अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. काही वर्षांपूर्वी एका ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रकने स्कुलव्हॅनला धडक दिल्याने त्या अपघातात निष्पाप ८ विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या गंभीर बाबीची दखल घेऊन परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ओव्हरलोड वाहतूकीवर निर्बंध घालावेत. अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांच्याकडे देण्यात आले आहे.

यावेळी अनिल उलमाले, राजू लोहकरे, रोहित बुरांडे, हिमांशु बोहरा, विक्कि भटगरे, हरिष देऊळकर,अरूण बोहरा, गौरव गायकवाड,अय्याज खान, नोमान शेख, विजय गेडाम, प्रणय पचारे, देवांशु बोहरा, संदिप वाघमारे,गोकुल मोरकुटे, संकेत ठाकरे, प्रणय नित यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post