वणी जवळ भिषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

वणी /

वणी बायपास मार्गावर कार आणि ट्रक चा भीषण अपघात घडला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील लालगुडा गावाजवळील ओम नगरी जवळ घडली. यात कारमध्ये बसलेले पाचही व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषीत केले. तर एका व्यक्तीवर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसऱ्या गंभीर जखमीला चंद्रपूर येथून नागपूर ला  रेफर करण्यात आले असून उपचार सुरू असल्याची माहिती आहे. 

प्राप्त माहितीनुसार, रियाज शेख (५५) हे भीमनगर वणी येथील रहिवासी आहे. त्यांचे लाल पुलिया परिसरात गॅरेज आहे. सध्या सुटी असल्याने ते त्यांच्या मुलीला कार शिकवीत होते. आज शुक्रवारी दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ते त्यांच्या ३ मुली व भावाच्या मुलीला घेऊन घुग्घुस रोडवर स्कोडा (O1AH 5700) ही कार घेऊन गेले होते. त्यांची मुलगी लियाबा (२०) ही कार चालवीत होती. दरम्यान लालगुड्याच्या आधी ओम नगरी जवळ डीपीरोडवर डिवायडरवरुन कार दुसऱ्या बाजूला गेली असता समोरून येणाऱ्या ट्रकची कारला धडक बसली. अपघात होताच घटनास्थळावरील लोक मदतीसाठी धावून आले. कारला ट्रकची धडक इतकी भीषण होती की कार ड्रायव्हर साईडने पूर्ण चेंदामेंदा झाली. लोकांनी जखमींना बाहेर काढले. जखमींना वणी तील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
अपघातात चेंदामेंदा झालेल्या कारमधून जखमींना बाहेर काढताना
 
डॉक्टरांनी रियाज यांची मुलगी लियाबा (२०), मायरा (१७), अमिरा यांना मृत घोषीत केले. तर वडील रियाज यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होता मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. तर त्यांच्या भावाची ४ वर्षाची मुलगी तिला चंद्रपूच येथून नागपूर येथे रेफर  करण्यात आले असून उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली त्यामुळे कारमधील पाच पैकी चार व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
 पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post