वणी :
कपाशीची लागवड अन् सोयाबीनच्या बहुतांश पेरण्या आटोपल्या असून शेतकऱ्यांना सध्या पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाच्या आगमनासाठी शेतकरी वरुणराजाकडे साकडे घालत असल्याचे दिसून येते. यातच वणी शहरातील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते श्री विजय बाबु चोरडिया यांच्या पुढाकारातून मित्र परिवारातर्फे वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी आणि बळीराजाला सुखी समाधानी करण्यासाठी शहरातील मोठी कमान चौक येथील आपल्या पारसमल प्रेमराज या प्रतिष्ठान समोर नागरिकांना मसाला चने वाटप करुन वरुण राजाला साकडे घातले.
गेल्या सात - आठ दिवसाआधी झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी, तूर आणि सोयाबीनच्या पेरण्या उरकल्या. परंतु तेव्हापासून अचानक पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. ज्यांच्याकडे ओलीताची सोय आहे ते शेतकरी कसेबसे पीक वाचवण्यासाठी धडपडत आहे, तर दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त ही वरुणराजावरचं आहे. त्यामुळे रुसलेल्या वरुणराजाला
प्रसन्न करण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विजय बाबु चोरडिया यांनी आज रविवारी सकाळी ११ वाजता मसाला चने वाटप करुन वरुणराजाकडे पावसासाठी एकप्रकारे साकडेचं घातले.