गणेशोत्सव हे एकतेचे प्रतीक – एड. कुणाल चोरडिया सर्वोदय चौकातील साई गणेशोत्सव उत्साहात प्रारंभ ,महाआरती व सामाजिक ऐक्याचा संदेश देत हाडपक्या गणपती उत्सव साजरा

वणी : 

सार्वजनिक गणेशोत्सव हे समाजातील एकतेचे व बंधुभावाचे प्रतीक असून, अशा उत्सवांमधून विविध सामाजिक उपक्रम राबविता येतात, असे प्रतिपादन ॲड. कुणाल चोरडिया यांनी केले. वणी शहरातील सर्वोदय चौक येथे साई गणेश मंडळाच्या वतीने आयोजित हाडपक्या अर्थात मस्कऱ्या गणपती निमित्त महाआरती कार्यक्रमात ते बोलत होते.
गणरायाला नुकताच निरोप दिल्यानंतर त्यांचे स्मरण म्हणून हाडपक्या गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे सांगत ॲड. चोरडिया यांनी सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी पत्रकार राजू धावंजेवार,परशुराम पोटे, डॉ. खापणे, सुनील इंदुवामन ठाकरे, जवाहर अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते. सुनील इंदुवामन ठाकरे यांनी हाडपक्या अर्थात मस्कऱ्या गणपतीचा इतिहास उपस्थितांना सांगितला. यावेळी विविध वक्त्यांनी प्रसंगानुरूप मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन संतोष कर्णेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे दिनेश दुर्गे, सफल आनंदवार, सुजल मांढरे, गणेश पारशिवे, राहुल आनंदवार, राहुल दांडेकर, तुषार भांडेकर, प्रवीण दुर्गे, पवन दुर्गे, रवी नान्ने, ईश्वर पारशिवे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post