वणी विधानसभा क्षेत्रातील सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश , एकनाथ शिंदे, संजय राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास; आशिष खुलसंगे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

वणी : 

शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. संजय राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत वणी विधानसभा क्षेत्रातील विविध गावांतील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
पश्चिम विदर्भाचे नेते श्री. परागभाऊ पिंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख श्री. हरिहर लिंगनवार आणि जिल्हाप्रमुख श्री. आशिष खुलसंगे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
या पक्षप्रवेशामध्ये उमरी येथील सरपंच तथा सरपंच संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री. तुकाराम माथनकर, कुंद्रा येथील सरपंच श्री. विजय ठावरी, रासा येथील सरपंच सौ. रत्नामाला ठावरी, विरकुंड येथील सरपंच सौ. वर्षा मडावी, उमरी येथील शाळा समितीचे श्री. नरेश आत्राम, विरकुंड येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. अमोल पारखी, रासा येथील सौ. सारिका अरके, तसेच झरी तालुक्यातील कोडपखिंडी येथील उपसरपंच श्री. हरिभाऊ राऊत आणि श्री. अरविंद खडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी वणी तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे, मारेगाव तालुका प्रमुख विशाल किन्हेकर, झरी तालुका प्रमुख बाडू चेडे, नरेंद्र बदखल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या या पक्षप्रवेशामुळे वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला चालना मिळाल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

आणखी काही सरपंच शिवसेनेच्या वाटेवर!

दरम्यान, वणी, झरी आणि मारेगाव तालुक्यांतील आणखी काही सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सरपंच संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा उमरीचे सरपंच श्री. तुकाराम माथनकर यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या पक्षप्रवेशानंतर ग्रामीण भागातील आणखी काही लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे माथनकर यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या संघटनात्मक हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post