भाजप वणी ग्रामीणच्या बूथ प्रमुखांची SIR संदर्भात बैठक संपन्न, SIR प्रक्रियेवर बूथ प्रमुखांना सविस्तर मार्गदर्शन

वणी :

भारतीय जनता पार्टी वणी ग्रामीणच्या वतीने बूथ प्रमुखांची SIR (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी दुपारी १२ वाजता बाकडे पेट्रोल पंपासमोरील भाजप कार्यालय, वणी येथे उत्साहात पार पडली.
बैठकीला भाजपचे नेते दिनकरराव पावडे, माजी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्या *सौ. मंगलाताई पावडे* तसेच नागपूर येथील प्रशिक्षक यांनी उपस्थित राहून बूथ प्रमुखांना SIR प्रक्रियेचे महत्त्व, मतदार यादी पुनरिक्षणाची कार्यपद्धती आणि बूथस्तरावरील जबाबदाऱ्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी संघटन अधिक सक्षम करण्यासाठी तसेच मतदार यादी पुनरिक्षणाचे काम प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. बूथ प्रमुखांनी विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीची माहिती वणी तालुका ग्रामीण (पश्चिम) अध्यक्षा सौ. मीरा शिवाजी पोतराजे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post