प्रतिष्ठित व्यापारी मनिष निमेकर यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम; दुर्मिळ 'दहीपळस' वृक्षाचे रोपण

वणी :

व्यवसाय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असतानाच सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव जपणारे प्रतिष्ठित व्यापारी मनिष निमेकर यांनी दुर्मिळातील दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या 'दहीपळस' या वृक्षाचे रोप मिळवून त्याची काळजीपूर्वक जोपासना केली असून, त्या रोपाचे आपल्या प्रतिष्ठानसमोर वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा प्रेरणादायी संदेश दिला.
दुर्मिळ वृक्षांचे संकलन आणि संवर्धन हा त्यांचा विशेष छंद असून, त्यांनी आपल्या टेरेस गार्डनमध्ये अनेक दुर्मिळ वृक्षांची जोपासना केली आहे. त्यातूनच दहीपळस या दुर्मिळ वृक्षाचे संगोपन करून त्याचे सार्वजनिक ठिकाणी रोपण करण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक (ACF) कोकणे मॅडम, वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) विरकर मॅडम, राजेंद्र देवडे तसेच मनिष निमेकर व त्यांच्या पत्नी उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी दुर्मिळ वृक्षांचे संरक्षण आणि लागवड करण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून, अशा उपक्रमांमुळे जैवविविधतेच्या संवर्धनालाही निश्चितच चालना मिळणार असल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post