छोरीया ले आऊट मध्ये भुस्खलन, रहिवाशांत भितीचे सावट, इलेक्ट्रिक पोल गेला २० फुट खड्यात... नदीकाठावरील ले आऊट ला धोका!

 वणी/

निर्गुडा नदीकाठावरील छोरिया ले आऊट मध्ये भुस्खलन झाले आहे येथिल विनायक रेसीडेंसी या पाच माळ्याच्या बिल्डिंगला धोका निर्माण झाला असून येथिल रहिवासी भयभीत झाले आहे. याकडे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
विनायक रेसिडेन्सी येथिल रहिवासी

शहरानजीक असलेल्या गणेशपुर ग्रामपंचायत हद्दीतील छोरिया ले आऊट येथिल विनायक रेसीडेंसी या पाच माळ्याच्या बिल्डिंग ला धोका निर्माण झाला आहे कारण हा एरिया निर्गुडा नदीकाठावरुन फक्त १० मिटर अंतरावर आहे आणि या परिसरातील इलेक्ट्रिक पोल २० फुट खड्यात गेला आहे. 
त्यामुळे या परिसरातील घरांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांत भितीचे सावट पसरले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post