वणी /
शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुरई येथे एका महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अविता विजय परसुटकार वय अंदाजे 33 वर्षे , असे मृतक महिलेचे नाव असून तिला लहान लहान तिन मुली आहेत.
दररोज प्रमाणे आज बुधवार दिनांक 27 ऑगस्टला सौ.अविता व तिचा पती विजय हे शेतात कामाकरीता गेले होते दुपारी 2:30 वाजे दरम्यान शेतातील विहीरीमध्ये तिचा पाण्यामध्ये मृतदेह आढळून आला. स्थानिक चौकशी केली असता मृत्यूचे कारण समजले नाही. या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
मृतक महिलेचे पश्चात पती विजय नानाजी परसुटकार, तिन मुली प्रांजली वय ८ वर्षे , देवांशी वय ६ वर्षे, श्रेया ३ वर्षे व सासु
माल्लुका नानाजी परसुटकार असा आप्त परिवार आहे.