ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचा पदग्रहण समारंभ उत्साहात

वणी :

वणी येथील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाच्या पदग्रहण समारंभाचे (Investiture Ceremony) उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना, शिस्त आणि संघभावना विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी पदाची शपथ घेत आपल्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार केला.
कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक व अध्यक्ष अजय पिंपळशेंडे (सिंगापूर), व्यवस्थापकीय संचालक संजय पिंपळशेंडे, प्राचार्या अश्विनी ढोले, उपप्राचार्या पूजा जोबनपुत्रा, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना पदके (Badges) व मानपट्टे (Sashes) प्रदान करण्यात आले आणि त्यांना पदाची शपथ देण्यात आली.
विद्यार्थी निवडणुकीत वेद देठे यांची हेड बॉय (Head Boy), तर पूर्वी श्रीपद्मावर हिची हेड गर्ल (Head Girl) म्हणून निवड झाली. स्वयम आस्वले यांची व्हाईस हेड बॉय (Vice Head Boy) आणि जैसमिन कोहली हिची व्हाईस हेड गर्ल (Vice Head Girl) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय साहिल तेलतुंबडे व सायली नवघरे यांची क्रीडा प्रमुख, फहीम बकाली व आर्या बिनगुले यांची इको क्लब प्रमुख, डिंपल भोंगळे व हर्षदा बारसागडे यांची शिस्त प्रमुख, नमन चिकटे यांची सांस्कृतिक प्रमुख, तर इफ्रा शेख हिची प्रिफेक्ट म्हणून निवड करण्यात आली.
हाऊस कॅप्टनपदी रुबी हाऊससाठी आर्या पिंपळशेंडे व किंशुक झाडे, टोपाझ हाऊससाठी अल्फिया अली व रिहान शेख, एमराल्ड हाऊससाठी अनन्या यादव व पुष्कर पावडे, तसेच सॅफायर हाऊससाठी आस्था भदोरिया व साई कटारे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी संस्थापक व अध्यक्ष अजय पिंपळशेंडे यांनी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडत आदर्श नेतृत्व करावे, असे आवाहन केले. व्यवस्थापकीय संचालक संजय पिंपळशेंडे यांनी शिस्त, आत्मविश्वास आणि समर्पणाच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश दिला. प्राचार्या अश्विनी ढोले यांनी नव्या विद्यार्थी प्रतिनिधींना शुभेच्छा देत नेतृत्व, संघभावना आणि शिस्त या गुणांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, पालक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post