वणी :
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वणी विधानसभा मतदारसंघातील विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता समितीच्या वणी विधानसभा सहअध्यक्षपदी निवड केली आहे.
वणी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या संजीवरेड्डी बोंदकुलवार यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि विकासदृष्टीचा लाभ मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या नियुक्तीमुळे वणी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाला अधिक गती मिळेल, तसेच शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.