वणी /
शहरातील नटराज चौकातील नटराज बाल गणेश मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १० सप्टेंबर रोजी बुधवारी सायंकाळी ५ वाजता श्री गणेशाची स्थापना, ११ सप्टेंबर ला सायंकाळी ८ वाजता एक मिनिट स्पर्धा ( हाऊजी) पुजेची थाळी डेकोरेटीव सामान घरुन आणावे लागेल), १२ सप्टेंबर ला सायंकाळी ८ वाजता एक मिनिट स्पर्धा (हाऊजी) संगीत खुर्ची,१३ सप्टेंबर ला सायंकाळी ८ वाजता एक मिनिट स्पर्धा (हाऊजी) फॅन्सी ड्रेस स्पर्धा, १४ सप्टेंबर ला दुपारी ३:३० वाजता चित्रकला स्पर्धा, सायंकाळी ८ वाजता एक मिनिट स्पर्धा (हाऊजी) अंताक्षरी स्पर्धा, १५ सप्टेंबर ला सायंकाळी ८ वाजता एक मिनिट स्पर्धा (हाऊजी) मोदक स्पर्धा, १६ सप्टेंबर ला सायंकाळी ६ वाजता भव्य जगराता (उज्जैन),१७ सप्टेंबर ला सायंकाळी ८ वाजता एक मिनिट स्पर्धा (कस्टमाईज हाऊजी)१८ सप्टेंबर ला सायंकाळी ५ वाजता महाप्रसाद त्यानंतर रात्री ९ वाजता भजन, १९ सप्टेंबर ला सायंकाळी ७ वाजता आनंद मेळावा व २० सप्टेंबर ला सायंकाळी ४ वाजता श्री गणेश मुर्ती विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.