चतुर्थ श्रेणी दर्जासाठी महसूल सेवकांचे निवेदन अन्यथा, १२ सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन

वणी /

महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असून मंजूर न झाल्यास दि. १२ सप्टेंबर शुक्रवारपासून महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या क्षेत्रात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल अशा इशाऱ्याचे निवेदन दि. ८ सप्टेंबर रोजी तहसीलदार वणी यांना देण्यात आले.

विविध मागण्यांसह हे निवेदन महसूल सेवक संघटना शाखा वणीच्या वतीने देण्यात आले असून त्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष प्र.अ.लोडे, उपाध्यक्ष सं.प्र.कुचनकर , सचिव संकिलवार , सदस्य पावडे, पचारे, कांबळे, सोनाखन, उईके, पथाडे, विकास चिडे,फुसाटे, टिपले, उके, टिपले यांच्यासह संघटनेच्या सदस्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post