वणी :
स्वर्गीय माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या तैलचित्रांची झालेली दुरवस्था लक्षात आल्यानंतर त्यांच्या तैलचित्रांचे जतन, सौंदर्यीकरण तसेच परिसराच्या नूतनीकरणाचा निर्धार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय खाडे यांनी केला आहे.
गुरुवार, ९ जुलै रोजी संजय खाडे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी तैलचित्रांचे जतन, आकर्षक सौंदर्यीकरण आणि परिसराचे सुशोभीकरण दर्जेदार पद्धतीने व शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
यावेळी बोलताना संजय खाडे म्हणाले की, "देशासाठी योगदान देणाऱ्या महान नेत्यांच्या स्मृती जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत सन्मानाने पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे."