गजानन बळीराम लाकडे यांचे दुःखद निधन

वणी :

शहरातील शास्त्रीनगर परिसरातील रहिवासी गजानन बळीराम लाकडे यांचे गुरुवार, दुपारी १ वाजता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
स्वर्गीय गजानन लाकडे हे श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेतील वसुली अभिकर्ता गणेश बळीराम लाकडे यांचे बंधू होत. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार, सकाळी १० वाजता वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
*भावपूर्ण श्रद्धांजली!* 💐

Post a Comment

Previous Post Next Post