स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त गरजू फळ-भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप, संजय खाडे यांच्या पुढाकारातून कष्टकरी विक्रेत्यांना पावसाळ्यात दिलासा

वणी :

स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सौजन्याने तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या पुढाकारातून वणी शहरातील गरजू फळ व भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या कष्टकरी आणि लहान व्यावसायिकांना संरक्षण व दिलासा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या जनसेवेच्या विचारांना अभिवादन करण्याच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित विक्रेते व नागरिकांनी स्वागत केले. समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी तेजराज बोडे, राजूभाऊ अंकितवार, अशोक चिकटे, उत्तमजी गेडाम, प्रमोद लोणारे, प्रेमनाथ मंगाम, वंदना आवारी, करुणा कांबळे, शामा तोटावर, पलास बोढे, रोहित मालेकर, अलका मोहाळे, अनंता डुभारे, सविता गंजेवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post