राष्ट्रपती पुरस्कार विजेते रमेश बोबडे यांचा महाराष्ट्र योग शिक्षक संघाकडून गौरव, वाढदिवस व सेवानिवृत्तीनिमित्त बोबडे यांना शुभेच्छांचा वर्षाव

वणी :

महाराष्ट्र योग शिक्षक संघ, महाराष्ट्र अंतर्गत वणी शाखा तसेच जगन्नाथ बाबा योग ग्रुप, चिखलगाव यांच्या वतीने पंचायत समिती वणीचे विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक श्री. रमेश प्रभाकर बोबडे यांचा वाढदिवस व सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
शिक्षण, समाजसेवा आणि योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे जिल्ह्यात आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या श्री. बोबडे यांच्या उत्कृष्ट राष्ट्रीय, शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल केंद्र शासनाने घेत त्यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च 'राष्ट्रपती पुरस्कार' प्रदान केला आहे. सौजन्यशील, मनमिळाऊ, प्रेमळ स्वभाव, प्रभावी वक्तृत्व आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
यावेळी श्री. बोबडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामगीता जीवन विकास परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या योग शिक्षक व योगसाधकांना श्री. रमेश बोबडे आणि श्री. रामराव गोहोकार यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री. लक्ष्मण इद्दे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. दिगंबर गोहोकार, तालुकाध्यक्ष वसंतराव उपरे, तालुका महासचिव श्री. जयप्रकाश राजुरकर, मुख्य संघटक श्री. रामराव गोहोकार, महिला संघटना प्रभारी सौ. ममता श्रीवास्तव, कोषाध्यक्ष सुधाकरराव गारघाटे तसेच संजय पोटदुखे, अशोक पारखी, तानाजी पाऊनकर, मारोती उपरे यांच्यासह अनेक योग शिक्षक, योगसाधक व सदस्य उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी श्री. रमेश बोबडे यांना वाढदिवस व सेवानिवृत्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील आयुष्यास निरोगी, आनंदी, समृद्ध व दीर्घायुष्य लाभावे तसेच समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य यापुढेही अशाच जोमाने सुरू राहावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post