संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

वणी :

मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, युवासेना व महिला आघाडी (वणी विधानसभा) यांच्या वतीने लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिर व औषध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आरोग्य शिबिर सोमवार, दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जैताई मंदिर, वणी येथे आयोजित करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक शिवसेना जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांनी केले आहे.
शिबिरात जनरल फिजिशियन, सर्जरी, बालरोग, नेत्र तपासणी व नेत्र चिकित्सा, मोफत चष्मे वाटप, अस्थिरोग, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, त्वचारोग आदी विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही केले जाणार आहे.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून वणी, मारेगाव व झरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या उपक्रमासाठी वणी येथील तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे, शहर प्रमुख शिवराज पेचे, मारेगावचे तालुका प्रमुख विशाल किन्हेंकार, शहर प्रमुख विजय मेश्राम तसेच झरीचे तालुका प्रमुख बाळू चेडे व शहर प्रमुख नाना सुगंधे यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
संपर्क :
शुभम गोरे- 7972284238
राहुल पारखी- 9169461616
प्रसाद ठाकरे- 9579556932
शिवराज पेचे- 9929925255
विशाल किन्हेंकार- 8668364937
विजय मेश्राम- 9370745327
बाळू चेडे – 9373036145
नाना सुगंधे – 9921492333

Post a Comment

Previous Post Next Post