वणी पब्लिक स्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

वणी :

येथील वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४९ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. शाळेच्या प्रभारी प्राचार्या सौ. आश्लेषा जेणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या कार्याचा प्रेरणादायी परिचय करून देण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री. सतीश बाविस्कर आणि श्री. तेलंग सर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक व लोककल्याणकारी कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ. वंदना बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post