वणी :
तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुशंगंगा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या निकालात सिव्हिल इंजिनिअरिंग अंतिम वर्षातील बिपाशा रामटेके हिने 86.67 टक्के गुण मिळवून सर्वाधिक यश संपादन केले. तर अतिफ सय्यद याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तृतीय वर्षात 84.00 टक्के, तसेच वरुण राजू पल्लेवार याने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेत 83.41 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
याशिवाय काशफ कायूम खान पठाण (ई.जे. तृतीय वर्ष) हिने 80.33 टक्के, हृदय देथे याने 80.00 टक्के, तर कुणाल सांबरे याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग अंतिम वर्षात 75 टक्के गुण मिळवून गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळवले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद आणि व्यवस्थापनाने त्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातही अशीच शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महाविद्यालयाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, आधुनिक शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांची अथक मेहनत यामुळे हे यश शक्य झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक आणि महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगिनवार, उपाध्यक्ष मोहन बोनगिनवार, प्राचार्य, सर्व प्राध्यापकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले.