शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा 60 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

वणी :

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पक्षाचा 60 वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील साईबाबा मंदिर चौक येथे असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ तसेच शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. पक्षाच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा यावेळी उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया, दिपक कोकास, आशिष खुलसंगे (राजे), किशोर नांदेकर, शुभम गोरे , कपील कुंटलवार,सचिन पडोळे, जयदीप नांदेकर भाग्यश्री वैद्य, सौ पुरी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post