वणी :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या 'रक्तदान महायज्ञ' उपक्रमाला वणी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून, तर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा क्षेत्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी वणी शहर, वणी ग्रामीण पूर्व आणि वणी ग्रामीण पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २२ जुलै रोजी बाजोरिया हॉल, वणी येथे हेडगेवार रक्तकेंद्र, नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात ४१२ नागरिकांनी नोंदणी केली. वैद्यकीय तपासणीनंतर २७२ रक्तदात्यांकडून रक्तसंकलन करण्यात आले.
शिबिरातील आकडेवारीनुसार वणी शहरातून २०५ नोंदणींपैकी १५२ जणांनी रक्तदान, वणी ग्रामीण पूर्वमधून १३२ नोंदणींपैकी ७० जणांनी, तर वणी ग्रामीण पश्चिममधून ७५ नोंदणींपैकी ५० जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ज्येष्ठ किसान नेते दिनकर पावडे, ज्येष्ठ कामगार नेते विजय पिदुरकर, माजी जिल्हाध्यक्ष राजू डांगे, तारेंद्र बोर्ड, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन एकरे तसेच माजी जिल्हा परिषद गटनेत्या सौ. मंगला पावडे यांनी भेट देऊन आयोजक व रक्तदात्यांचे कौतुक केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगराध्यक्ष सौ. विद्याताई आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, विधानसभा प्रमुख व जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, रक्तदान अभियानाचे विधानसभा संयोजक तथा जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे, जिल्हा सचिव संतोष डंभारे, नितीन वासेकर, माजी तालुकाध्यक्ष गजानन विधाते, माजी पंचायत समिती सभापती सौ. लिशा विधाते, ज्येष्ठ नेत्या सौ. जयमाला दरवे, सौ. संध्याताई लोडे यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, विविध आघाड्या व सेलचे पदाधिकारी, संयोजक आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले. या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदाते व नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.