वणी : प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माळी बहुउद्देशीय संस्था, वणी यांच्या वतीने शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक बस स्टँडसमोरील संस्थेच्या कार्यालयात भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक समता, शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुवार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भवानी मांदाळे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. विनोदकुमार आदे उपस्थित राहतील.
प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा विद्याताई आत्राम, ऍड. पोर्णिमा शिरभाते (समाजसेविका), माजी सीडीपीओ सुरेखा तुराणकर, उपनगराध्यक्ष राकेश बुग्गेवार, माजी पंचायत समिती सभापती संजय पिपळशेंडे, सरपंच दीपक मत्ते तसेच सुप्रसिद्ध व्याख्याते समीर लेनगुळे यांची उपस्थिती लाभणार आहे.
या मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.
यामध्ये प्रमोद निकुरे (शिवाजी व्यायाम शाळा अध्यक्ष), रफिक रंगरेज (दलित मित्र पुरस्कार प्राप्त), सुरेश रायपुरे (माजी नगराध्यक्ष), डॉ. दिलीप अलोने (सुप्रसिद्ध नकलाकार), राम झिले (व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त, नकलाकार), नारायण गोडे, रवींद्र कांबळे (आरोग्य सेवक), बंडू वाढई, हर्षल शेंडे यांचा समावेश आहे.
तसेच स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू झालेल्या माळी समाजातील गुणवंतांचा, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांचाही भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भवानी मांदाळे, उपाध्यक्ष महेश चौधरी आणि सचिव भास्कर वाढई यांनी केले आहे.