गोकुळनगरमध्ये गोमांस प्रकरणी दुहेरी कारवाई; १.५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, तीन आरोपींवर गुन्हे दाखल; पोलिसांची सकाळपासून सलग धडक मोहीम

वणी: प्रतिनिधी

वणी शहरातील गोकुळनगर परिसरात शुक्रवारी (दि. 10 एप्रिल) सकाळी पोलिसांनी गोमांस तस्करी व विक्रीविरोधात सलग दोन कारवाया करत मोठा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तीन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण हजारो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे.

🟠 पहिली कारवाई : ९० किलो गोमांस जप्त

सकाळी साडेसातच्या सुमारास गोकुळनगर येथे पोलिसांनी छापा टाकून आरोपी
सलमान शकिल शेख (२५) व नावेद शेख रियाज (२२), दोघेही रा. खडबडा मोहल्ला, यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून सुमारे ९० किलो ५०० ग्रॅम गोमांस (किंमत अंदाजे ₹१८,१००) जप्त करण्यात आले. हे मांस अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवले असल्याचे फिर्यादी विशाल दुधबळे यांच्या जबानीवरून स्पष्ट झाले.
या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम 5, 5(सी), 9, 9(अ) तसेच BNS कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार मारोती पाटील करत आहेत.

🟡 दुसरी कारवाई :

 गोमांसासह मोपेड जप्त
यानंतर सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्याच परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली.
आरोपी अब्दूल माजिद अब्दूल सत्तार (३५), रा. मोमिनपुरा याला अटक करण्यात आली.
त्याच्याकडून ३९ किलो गोमांस (₹७,८००) तसेच विना नंबरची ज्यूपीटर मोपेड (₹२०,०००) असा एकूण ₹२७,८०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपी हा मोपेडवरून गोमांस विक्रीसाठी नेत असल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस कर्मचारी गजानन सावसाकडे करीत आहेत.

🔍 पोलिसांची कारवाई कायम

दोन्ही घटनांमध्ये फिर्यादी विशाल पांडुरंग दुधबळे (रा. पटवारी कॉलनी, वणी) यांच्या तक्रारीवरून गुन्हे नोंदविण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
गोकुळनगर परिसरात झालेल्या या दुहेरी कारवाईमुळे अवैध गोमांस विक्रीविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post