वणी :
वणी पंचायत समिती अंतर्गत मौजा मानकी येथे ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतीसूर्य जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुराम पोटे यांच्या हस्ते जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका सौ. बेबिताई मालेकर, सुनिता पत्रकार, प्रदीप मालेकर, गणेश वाढई, ग्रामपंचायत कर्मचारी अविनाश सरवर तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी जोतिबा फुले यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.