वणीत धुलीवंदनाच्या दिवशी हास्य कवि संमेलन, अति दिड शहाणे समितीचे आयोजन.

वणी:-

वणी येथे २५ वर्षांपासून अ.भा. अति दिड शहाणे सम्मेलन समिती वणीच्या वतीने दरवर्षी धुलिवंदनाचे दिवशी कवि संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.
यावर्षी सुध्दा ३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता शासकीय मैदान पाण्याचे टाकी जवळ वणी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनात शशीकांत यादव म.प्रदेश, सरदार प्रताप फौजदार नवि दिल्ली,सुश्री सोनल जैन सुरत, अमित शुक्ला प्रयागराज उ.प्रदेश, दिनेश देशी घी शाजापूर हे प्रसिद्ध कवी उपस्थित राहणार आहेत.
या हास्य कवी संमेलनाचा श्रोत्यांनी मंत्रमुग्ध आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक राजू उंबरकर, राकेश खुराणा, रवि बेलुरकर, निकेश गुप्ता, प्रदिप बोनगीरवार, आशिष खुलसंगे, डॉ. महेंद्र लोढा, भिकमचंद गोयनका, दिपक छाजेड, बंटी खुराणा, तुषार अतकरे, रमेश तांबे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post