वणी येथे सहकार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

वणी / प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई, जिल्हा उपनिबंधक कार्यालय यवतमाळ आणि श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी वणी येथे सहकार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले असून संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिराची सुरुवात सकाळी १०.०० ते १०.३० या वेळेत नोंदणी व अल्पोपहाराने होणार असून सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून म.रा. पतसंस्था फेडरेशन लि. मुंबईचे अध्यक्ष श्री. काकासाहेब कोयटे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणीचे अध्यक्ष मा. अॅड. देविदासजी काळे राहणार आहेत.
या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. नानासाहेब चव्हाण (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ), श्री. राजुदास जाधव (कार्याध्यक्ष, म.रा. पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई), श्री. शांतिलाल सिंगी (महासचिव), श्री. दादाराव तुपकर (कोषाध्यक्ष), श्री. सुदर्शन भालेराव (उपकार्याध्यक्ष) तसेच श्री. धनंजय तांबेकर (संचालक) उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत यवतमाळ जिल्हा सहकारी बोर्डाचे तज्ज्ञ संचालक प्रा. कवडूजी नगराळे यांचे “पतसंस्थांचे निधी व्यवस्थापन” या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते २ या वेळेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत मा. श्री. धनंजय तांबेकर यांचे “संस्थेच्या विकासात संचालक मंडळाची भूमिका” या विषयावर मार्गदर्शन होईल. तर दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत श्री. काकासाहेब कोयटे यांचे “पतसंस्थांचे व्यवस्थापन” या विषयावर व्याख्यान होणार आहे. शिबिराचा समारोप दुपारी ४.०० ते ४.३० या वेळेत शंका समाधान व समारोप कार्यक्रमाने होणार आहे.
नोंदणी केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 
हे शिबिर वसंत जिनिंग हॉल, शेतकरी मंदिरामागे, वणी, जि. यवतमाळ येथे पार पडणार आहे.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अॅड. देविदास काळे, उपाध्यक्ष श्री. विवेकानंद मांडवकर तसेच संचालक मंडळ व कर्मचारी वृंद प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post