शिवसैनिकांची रायगड वारी; वणीवरून उत्साहात रवाना

वणी / प्रतिनिधी 

महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार मनाशी बाळगून शिवसैनिकांची रायगड वारी आज वणीवरून उत्साहात रवाना झाली. भगवा झेंडा हातात घेत पवित्र कार्यासाठी निघालेल्या या वारीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिसर स्वच्छ करून अभिवादन करण्याच्या उद्देशाने ही वारी आयोजित करण्यात आली आहे. तसेच संत गाडगे बाबा यांच्या स्वच्छतेच्या संदेशाला अनुसरून स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
अजिंक्य शेंडे व राजू तुरणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्वच्छता अभियान वारीला समाजसेवक छोटू राऊत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भगवी झेंडी दाखविण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांचा जत्था रायगड किल्ला कडे रवाना झाला.
यावेळी अजय धोबे, संदीप गोहोकर, शैलेश ढोके, कैलाश पचारे, अजय कौरासे, प्रविण पेचे, जितू शिरभाते, आशिष रिंगोले, महादेव दोडके यांनी वारीस शुभेच्छा दिल्या. तसेच अजिंक्य शेंडे, राजू तुरणकर, बंडू चांदेकर, नंदू ढूमने, दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे, मनीष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले, मिलिंद बावणे, आदित्य नामेश बिलोरीया, श्रीकांत यशवंत उके, रौनक रवी बिलोरीया, सुयेश नगराळे, संजोग झाडे, तुषार दुरुटकर आदी शिवसैनिक या वारीत सहभागी झाले आहेत.
ही वारी केवळ स्वच्छता मोहीम नसून, महापुरुषांचे विचार कृतीतून जपण्याची आणि स्वाभिमानाची परंपरा पुढे नेण्याची चळवळ असल्याची भावना सहभागी शिवसैनिकांनी व्यक्त केली. शिवसैनिकांच्या या उपक्रमामुळे वणीकर जनतेच्या हृदयातून स्तुतीसुमने उधळली जात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post