नवनियुक्त नगरसेविका रिता पहापळे ‘ॲक्शन मोड’वर , वार्डातील विकासकामांना जोरदार सुरुवात

वणी /

नवनियुक्त नगरसेविका रिता महेश पहापळे यांनी पदभार स्वीकारताच वार्डातील विविध विकासकामांचा आढावा घेतला असून त्या सध्या पूर्णतः ‘ॲक्शन मोड’वर असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांनी कामांना तात्काळ सुरुवात केली आहे.
प्रगती नगर प्रभाग क्रमांक २ येथील पाण्याच्या टॉकीजवळ असलेल्या ग्राउंडला संरक्षक भिंत ( वॉलकंपाउंड) नसल्याने तेथे अस्वच्छता, वाढलेली झाडे झुडपे यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे सदर ग्राउंडची साफसफाई करून संरक्षक भिंत बांधावी तसेच नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅकची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी नगराध्यक्षांना निवेदन सादर केले आहे. या सुविधांमुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षितता मिळण्यासोबतच आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळणार आहे.
वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले असून, येणाऱ्या काळात आणखी विकासकामे मार्गी लावण्याचा विश्वासही रिता महेश पहापळे यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post