मानकी येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे खुले सामन्यांचे आयोजन, ५ फेब्रुवारी ला सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन

वणी /

जय गुरुदेव क्रीडा मंडळ, मानकी यांच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे खुले सामने दिनांक ५ व ६ फेब्रुवारी रोजी मानकी येथिल खुल्या पटांगणात आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत जिर्निंगचे अध्यक्ष प्रमोद वासेकर राहणार आहेत.
तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, मुंबई पनन महासंघाचे संचालक संजय खाडे, शंकरराव वहऱ्हाटे, पुरुषोत्तम आवारी, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, माजी सभापती पं. स. वणी, नितिन वासेकर, संतोष डंभारे, मंगलाताई पावडे,सौ. मेघा वासेकर (संचालिका, धन्वंतरी फाउंडेशन), प्रविण झाडे (अध्यक्ष, सरपंच संघटना वणी), तुकाराम माथनकर (जिल्हाध्यक्ष, सरपंच संघटना),
कैलास पिपराडे (सरपंच, मानकी), शंकर माहुरे (उपसरपंच, मानकी),सौ. मिनाक्षीताई मिलमिले (पोलीस पाटील, मानकी), किशोर नागपुरे (अध्यक्ष, शाळा समिती), मुख्याध्यापक आनंद पाटील, कुणाल वासेकर, साई लॅपटॉप ओनर, अॅड. प्रविण पुरी (विशेष सहाय्यक सरकारी वकील),तुळशीदास नागपुरे (सोसायटी अध्यक्ष), विजय काकडे (अध्यक्ष, तंटामुक्ती), सुनील कुत्तरमारे (अध्यक्ष, जय गुरुदेव क्रीडा मंडळ) व परशुराम पोटे (पत्रकार) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यासह कबड्डी सामन्यांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post