शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या उद्योजकांनी तातडीने मदत द्यावी. - राजु धावंजेवार, अध्यक्ष (मा.ह.सु.प. महाराष्ट्र प्रदेश)

वणी: 

वणी परिसरातील उद्योगधंदे आणि दयनीय रस्त्यामुळे शेती व्यवसायाला गंभीर नुकसान होत आहे. औद्योगिक कारखान्यामधून निघणारा धूर आणि रस्त्यावरील वाहतूकीमुळे निर्माण होणारी धूळ शेतातील पिकांवर बसते ज्यामूळे पिकांच्या दरहेक्टरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. वायू प्रदूषण शेतीस मारक ठरत असून नागरीक आणि शेतकरी या समस्येबाबत गंभीर चिंता व्यक्त करीत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रदुषणास जबाबदार असलेल्या उद्योगधारकांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडे एका निवेदनातून केली आहे.

वणी तालुक्यातील उद्योगांची संख्या सतत वाढत असून खुले भूमीगत कोळसा खाणी, सिमेंट प्रकल्प, चुना भट्टे, डोलामाईट, डांबरप्लांट, गिट्टी क्रेशर, सिमेंटपाईप प्लांट, विट भट्टे इत्यादी लहान मोठे उद्योग वणी तालुक्यात वाढत आहे.
उद्योगामार्फत निघणारा धूर आणि रस्त्यावरील अवजड वाहनाच्या वाहतुकीमूळे हवेत उडणारी धूळ हवेतून सर्वत्र पसरते ही धूळ शेतातील पीकावर व झाडांवर बसल्यामुळे प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते परिणामी पिकांची वाढ व उत्पादन दोन्ही कमी होतात. जवळपास चार ते पाच दशकापासून शेतीत कोळसा आणि सिमेंट मिश्रीत धुळीचे संचयन होत आहे. वाहनातून निघणारा इंधन धूर वातावरणात मिसळत असल्यामुळे दर हेक्टरी कापसाचे उत्पादन २५ ते ३० क्विंटल तर सोयाबीनचे उत्पादन ८ ते १० क्विंटलपर्यंत कमी झाले आहे. अशाप्रकारे घटणाऱ्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या पिकावरचा खर्चही निघत नाही. परिणामी शेतकरी गंभीर सकंटात सापडला आहे.
जबाबदार उद्योजकांनी आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशा प्रकारची मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेद्वारे प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ चंद्रपूर यांचेकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post