ठरलं; यावर्षी रंगपंचमीला गुद्दलपेंडीच्या खेळाचे आयोजन, काय ती एॅक्शन आणि काय तो ठोसा!

वणी /

 महाराष्ट्रात केवळ एकाच ठिकाणी म्हनजे वणीत खेळला जाणारा खेळ म्हणजे गुद्दलपेंडी. दरवर्षी धुळवडीला म्हणजे रंगपंचमीला वणीत हा अभूतपूर्व खेळ रंगतो. मात्र हा खेळ कोरोना काळात स्थगित करण्यात आला होता परंतु यावर्षी ३ मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी गुद्दलपेंडीच्या खेळाचे आयोजन 
शहरातील रामपुरा वार्डातील सवारी बंगल्यासमोरील खुल्या पटांगणात करण्यात आले आहे अशी माहिती आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.

वणी शहराला विदर्भाचं पुणं म्हटलं जातं. ते केवळ इथे असलेल्या सांस्कृतिक वारशामुळे. असाच एक वणीचा वारसा म्हणजे गुद्दलपेंडी. रंगपंचमीच्या रात्री गुद्दल पेंडी हा मैदानी खेळ खेळला जातो. या खेळाला 100 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असल्याचे बोलले जाते. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी बाबुलाल पोटदुखे, संजय शिवरात्रीवार, सुर्यकांत मोरे, अजय बोबडे, दिपक बोंडे, दिपक पचारे, दिपक देठे, दिलीप खाडे या हौशी खेळाडूंनी पुढाकार घेऊन गुद्दलपेंडी खेळाचे आयोजन केले आहे.

"गुद्दलपेंडी" म्हणजे कायमचे वैर संपवणारा खेळ

हा खेळ तसा मारधाड आणि ऍक्शन से भरपूर आहे. मारामारीत बदले की आग वगैरे ही आहे. पण हा जरी मारधाड करण्याचा खेळ असला तरी याचा उद्देश मात्र वैर संपवणे आहे. पूर्वी एकमेकांशी वैर असले की ते लोक गुद्दलपेंडीत लढायचे. ठोसे लगावून एकमेंकांवरचा पूर्ण राग काढायचे. जसा चित्रपटात मारधाड नंतर शेवट गोड होतो, तसाच या खेळात लढत संपली की गळाभेट घेऊन लढतीसोबतच वैरही संपवलं जातं.

Post a Comment

Previous Post Next Post