वणी :
शहरातील योगीराजनगर येथे असलेल्या श्री श्यामबाबा मंदिरात २७ व २८ फेब्रुवारीला श्री श्याम धाम फाल्गुन उत्सव 'वृंदावन रस में' उत्साहाचे आयोजन श्री श्याम सेवा समिती, वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
२७ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता निशान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७.३० वाजता भजन संध्या होणार आहे. वृंदावन येथील लाडली थी रिथिमा श्री जी यांच्या मधूर भजनांनी भक्तांना मंत्रमुग्ध केले जाणार आहे. रात्री ८.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. कोलकाता येथील भजन गायक डॉ. हरीश भारती हे आपल्या सुमधुर वाणीने भजन सादर करणार आहेत. यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. सर्व खाटू श्याम भगवान भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.