तहसील कार्यालयासमोरील ‘नो पार्किंग’मध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई

वणी /

तहसील कार्यालयासमोरील ‘नो पार्किंग’ क्षेत्रात नियमबाह्यरीत्या उभी करण्यात आलेली वाहने यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

तहसील, पोलिस स्टेशन, पंचायत समिती, न्यायालय इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होऊ नये तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी ‘नो पार्किंग’ नियमांचे पालन करावे, अन्यथा पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post