वांजरी येथे नकलांनी प्रेक्षक हसून हसून लोट पोट... , लोककला लोकाश्रयावरच जिवंत राहणार. - डॉक्टर दिलीप अलोने

वणी /

लोककला रंजन आणि प्रबोधनाचे सशक्त माध्यम आहे लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब त्याच्यात सामावले आहे बदलत्या अभिरुची मुळे आणि वाढत्या सांस्कृतिक आक्रमणामुळे लोकाश्रयावर जिवंत राहणाऱ्या लोककला लोकपाबत आहेत त्यांचे जतन करणे काळाची गरज आहे असे मत लोक कलावंत डॉक्टर दिलीप अलोने यांनी व्यक्त केले. 
लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत वांजरी येथील विशेष शिबिरात नकला कार्यक्रमाच्या सादरीकरणात ते बोलत होते .
प्रारंभी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नीलिमा दवणे व डॉक्टर विकास जुंनगरी यांनी डॉक्टर अलोने यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी व्यासपीठावर सरपंच अरुणाताई जेनेकर उपसरपंच अमोल कुंभारे व विकास जेणेकर उपस्थित होते. 
वर्तमान सामाजिक वास्तवाचे भान जपण्यासाठी संवेदना जागृत ठेवा असे आवाहन करीत डॉक्टर अलोने यांनी पट्ट्या महाद्या मावलगन कवा होणार मला निवडून द्या, या नकलांनी उपस्थित त्यांना पोट धरून हसायला लावले आपल्या समर्थ अभिनय आणि संवाद शैलीत नकलांचे सादरीकरण करून विद्यार्थी व गावकरी यांची प्रसंशा मिळविली .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बिलोरीया स्वयंसेवक दुष्यंत खामनकर ऋतुजा रामगिरवार नीलिमा काथोटे रुद्र कनाके यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post