आयशा शेख नॅशनल स्टुडन्ट काँग्रेस २०२६ परिषदेत प्रथम , लोकमान्य टिळक महाविद्यालयांकडून कौतुक

वणी :  
          शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी च्या विज्ञान विभागातील द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आयशा शेख हिने श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे २३ व २४ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस मध्ये ह्युमॅनिटीज लँग्वेज आणि फाईन आर्ट्स या कॅटेगरीमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. 
        या परिषदेत देशभरातील पदवी, पदव्युत्तर व संशोधन स्तरावरील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी व त्यापासून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन त्यापासून रोजगार निर्मिती कडे विद्यार्थी वळावा यासाठी आयोजित "नॅशनल स्टूडेंट काँग्रेस" या कॉन्फरन्स मध्ये विविध राज्यांमधून विद्यार्थी सहभागी होतात. यावर्षी ही कॉन्फरन्स श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे घेण्यात आली. 
        या यशामध्ये तिला प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांचे विशेष सहकार्य आणि योगदान लाभले तसेच वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र मत्ते आणि मार्गदर्शक डॉ.अजय राजूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तांत्रिक विषयात मनीष पेटकर यांनी सहकार्य केले. 
         शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया तथा प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांनी या यशाबद्दल आयशाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post