डॉक्टर ठाकरे यांच्या दवाखान्यासमोर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची मागणी , माजी नगरसेवक सिद्दीक रंगरेज यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

वणी /

शहरातील विराणी फंक्शन हॉल समोरील डॉक्टर ठाकरे यांच्या दवाखान्यासमोर अपघातांचा धोका लक्षात घेता गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात माजी नगरसेवक सिद्दीक रंगरेज यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, संबंधित ठिकाणी नवीन सिमेंट रस्ता बांधण्यात आला आहे परिणामी वाहनांची वेगवान ये-जा वाढली असून, अपघाताची शक्यता कायम आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ गतिरोधक बसवावा, अशी मागणी त्यांनी केली.
या मागणीवर प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post