प्रजासत्ताक दिनी आंतर शालेय नृत्य स्पर्धा, प्रेस वेल्फेअर असोसिएशनचे आयोजन

वणी :

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील प्रेस वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने आंतर शालेय समहू नृत्य स्पर्धेचे आयोजन येथील एस पी एम हायस्कूलच्या रंगमंचावर करण्यात आले आहे. अ व ब अश्या दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. 

या स्पर्धेत शहरातील शाळांनी सहभागी होण्यासाठी स्पर्धा संयोजक विनोद ताजने यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन प्रेस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बिलोरिया व सचिव सागर बोढे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post