विद्यार्थ्यांना शुद्ध जल उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ; नगराध्यक्ष सौ. विद्याताई आत्राम यांच्या हस्ते शाळा क्रमांक 7 पासून सुरुवात

वणी:– 

        नगर परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा संकल्प नवनिर्वाचित अध्यक्ष विद्याताई आत्राम यांनी केला होता. त्याची पूर्तता दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी शाळा क्रमांक 7 पासून करण्यात आली. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती सोनाली प्रशांत निमकर या होत्या. नगर परिषद अध्यक्ष विद्याताई खेमराज आत्राम यांच्या हस्ते शुद्ध जल पुरवठा करण्याच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर चांदेकर उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा प्रशासन अधिकारी गजानन कासावार यांनी केले. 
      या प्रसंगी विद्याताई आत्राम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, नगर पालिकेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे यासाठी नगर परिषद कटिबद्धः आहे. या उपक्रमाची सुरुवात आज नगर परिषद शाळा क्रमांक 7 मधून करण्यात येत आहे. हा शुद्ध पिण्याचा पुरवठा नियमित करण्यात येईल. असा विश्वास उपस्थिताना दिला. 
     शिक्षण सभापती सोनाली निमकर अध्यक्षीय प्रतिक्रिया व्यक्त करतांना मराठी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 
     त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचा पाण्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र समन्वयक चंदू परेकर यांनी केले. आभार प्रदर्शन दिगंबर ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, विजय चव्हाण, सौरभ बहादे यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी शाळेतील पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post