हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त युवासेने तर्फे भव्य मॅराथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग

वणी /

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 छत्रपती शिवाजी महाराज (शिवतीर्थ), वणी येथून भगवा ध्वज फडकावत छत्रपती शिवाजी महाराजांना हाराअर्पण करून या मॅराथॉनला उत्साहात सुरुवात झाली आणि मोठ्या जनसहभागात ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.

या मॅराथॉन स्पर्धेत युवक, युवती, बालकांसह क्रीडाप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धा एकूण चार गटांत घेण्यात आली होती.

ओपन गट (मुले) मध्ये विरोचन गोडे यांनी प्रथम, सौरभ दरणे यांनी द्वितीय, शिवम जंगठे यांनी तृतीय तर पियूष पडलमवार यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला.

ओपन गट (मुली) मध्ये गौरी पांगुळ प्रथम, प्रशांती वसाके द्वितीय, अचल झिले तृतीय तर समीक्षा हनमंते चतुर्थ ठरल्या.

१६ वर्षांखालील गट (मुले) मध्ये शिवम ओझा प्रथम, शिवम कुइटे द्वितीय, सुमित ढेंगळे तृतीय तर अयान सिद्दिकी चतुर्थ क्रमांकावर राहिला.
१६ वर्षांखालील गट (मुली) मध्ये नव्या पिदुरकर प्रथम, पल्लवी ठाकरे द्वितीय, जानवी ठाकरे तृतीय तर श्रद्धा देशमुख यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला.
विजेत्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व आकर्षक स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेदरम्यान शिस्तबद्ध आयोजन, योग्य सुरक्षितता व्यवस्था आणि उत्साही वातावरण याचा प्रत्यय नागरिकांना आला.
हा उपक्रम वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर व किरणताई देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नव्याने निवडून आलेले नगरसेवक यांचा शाल व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजन व नेतृत्व युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांच्या वतीने करण्यात आले होते. 
या मॅराथॉनमुळे युवकांमध्ये आरोग्याची जाणीव, क्रीडासंस्कृती व सामाजिक ऐक्याचा संदेश पोहोचल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.
यावेळी शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये डॉ. संचिता नगराळे, सुरेखा ढेंगळे, दीपक कोकास, सुनील कातकडे, गणपत लेडांगे, आयुष ठाकरे, रवी बोढेकर, विनोद दुमणे, सुरेश शेंडे, राजू तुराणकर, अजय चन्ने, डॉ. विलास बोबडे, टिकाराम खाडे, बबन केळकर, राजू पाटील, चेतन उलमाले, मिलिंद बावणे, संजोग झाडे, कुणाल खामकर, अक्षय लाडे व संस्कार हेपट यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post