वणी /
नगर परिषदेत दीर्घकाळ सेवा बजावलेले कर्मचारी विजय महाकुलकर हे आज ३१ जानेवारी ला सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि जनहिताला प्राधान्य देणाऱ्या सेवेसाठी मानवी हक्क सुरक्षा परिषद यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, परशुराम पोटे, ज्ञानेश्वर बोनगीनवार, महादेव दोडके, संजय चिंचोलकर, राजु जयस्वाल, ईश्वर शर्मा तसेच मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी महाकुलकर यांच्या सेवाकालातील कार्याची प्रशंसा करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.