पुसद प्रतिनिधी : वसीम खान
बुधवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास पुसद रस्त्यावरील काळगाव फाटा पुलाजवळ झालेल्या रस्ते अपघातात एक पुरूष आणि एक महिला गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले आढळले.
याच दरम्यान वाहतूक विभागाचे उमरखेड शाखेत पोलिस कॉ. सुनील आडे आणि पोलिस.कॉं. अजमल खान आपले कर्तव्य पूर्ण केल्यानंतर एका खाजगी वाहन क्रमांक MH -29 BV- 7661 ने पुसदकडे जात होते.
जखमींना पाहून दोन्ही पोलिसांनी वेळ वाया न घालवता त्यांना तातडीने त्यांच्या वाहनातून पुसदच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले.
चौकशीदरम्यान जखमींनी त्यांचे नाव योगेश उत्तम जाधव (रा. अंबोरा , तहसील महागाव) असे सांगितले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी घटनेची माहिती महागाव पोलिस ठाण्याला देण्यात आली आहे.
या पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, त्यांची संवेदनशीलता, जबाबदारी आणि कर्तव्याच्या वेळेनंतरही सामान्य नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी दाखवलेली सेवाभावना यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.